वाकड (पुणे) येथे पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली नागरिकांना कृत्रिम विसर्जन हौदात मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन
वाकड (जिल्हा पुणे) – येथील ‘द्रोपदा लॉन्स’ येथे श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन हौद सिद्ध करण्यात आला आहे. ‘नदी, नाले, ओढे, विहिरी यांमध्ये मूर्तीविसर्जन केल्यास पर्यावरणाला हानी पोचते. ही हानी होऊ नये आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा, या उद्देशाने हा विसर्जन हौद निर्माण करण्यात आला आहे. मूर्ती विसर्जनासाठी या हौदाचा उपयोग करावा’, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिली आहे. (पाण्यात मूर्ती विसर्जित केल्याने पाण्यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, हे अनेक वेळा प्रयोगातून सिद्ध करण्यात आले आहे. वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विर्सजन करावे, असे ‘पूजासमुच्चय’ या ग्रंथात म्हटले आहे. त्यामुळे कुठल्याही फसवणुकीला बळी न पडता गणेशभक्तांनी नैसर्गिक जलस्रोतातील वहात्या पाण्यातच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि गणेशाची कृपा संपादन करावी ! – संपादक)
वाकडकर यांनी सांगितले की, या ठिकाणी सर्व नागरिक आणि गणेशोत्सव मंडळे यांसाठी ५ फुटांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या गणेशमूर्तींचे विसर्जन, तसेच मूर्तीदान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|