आच्छादन म्हणजे काय ?
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘भूमीच्या पृष्ठभागाला झाकणे’, म्हणजे ‘आच्छादन.’ मातीची सजीवता आणि सुपिकता टिकवून ठेवण्याचे कार्य आच्छादन करते. आच्छादनामुळे मातीतील झाडांसाठी उपयुक्त अशा जिवाणूंचे कार्य चांगल्या पद्धतीने चालू रहाते. ‘वाफसा स्थिती’ (मातीत झाडासाठी आवश्यक ओलावा) आपोआप टिकून रहाते. त्यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये आच्छादनाला पुष्कळ महत्त्व आहे. छतशेतीमध्ये जर आच्छादन व्यवस्थित केलेले असेल, तर निराळी मशागत करण्याची आवश्यकता रहात नाही. आच्छादनासाठी (झाडाभोवतीची माती झाकण्यासाठी) पालापाचोळा, सुका काडी-कचरा, फळे किंवा भाज्या यांच्या साली, देठ असे विघटनशील पदार्थ वापरावेत.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१.८.२०२२)
(सविस्तर माहितीसाठी ‘सनातन संस्थे’च्या संकेतस्थळाची मार्गिका किंवा QR code : https://www.sanatan.org/mr/a/83655.html)