पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी त्यांचे ज्ञान दैवी आणि अमृतासमान वाटणे
‘पू. डॉ. शिवकुमार ओझा हे ज्ञानमार्गी संत आहेत. ते भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक आहेत. भारतीय संस्कृतीचा अभ्यास केल्यावर तिचे महात्म्य त्यांच्या लक्षात आले आणि लोकांनाही भारतीय संस्कृतीची महानता कळावी, यासाठी त्यांनी ‘भारतीय संस्कृति महान एवं विलक्षण’, या हिंदी ग्रंथाचे लेखन केले. २९.५.२०२२ या दिवशी ‘ज्ञानमार्गी संतांच्या वाणीतील चैतन्याचा परिणाम कसा होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी पू. डॉ. शिवकुमार ओझा यांच्या मार्गदर्शनाचा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प्रयोग घेण्यात आला. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या त्रासदायक अन् चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. मार्गदर्शनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे
अ. पू. डॉ. शिवकुमार ओझा यांना पाहिल्यावर मला ते लहान बालकाप्रमाणे वाटले.
आ. ‘पू. ओझा यांचे ज्ञान बुद्धीअगम्य आहे’, असे मला वाटले.
इ. ते मार्गदर्शन करत असतांना ‘साधकांना किती ज्ञान देऊ ?’, असे त्यांना वाटत असल्याचे मला जाणवले.
ई. मला त्यांचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे विचार मोलाचे आणि उच्च स्तराचे जाणवले. त्यांचे बोलणे आणि विचार पुष्कळ व्यापक स्तरावरील होते.
२. आध्यात्मिक सत्रावरील उपाय झाल्यामुळे जाणवलेला त्रास
अ. पू. डॉ. शिवकुमार ओझा मार्गदर्शन करत असतांना, ‘आपण गुहेत जातो, त्याप्रमाणे कुठेतरी आत आत जात आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझे डोके आणि डोळे जड झाले, तसेच माझ्या सहस्रारचक्रावर वेदना जाणवल्या.
३. चांगल्या अनुभूती
अ. त्यांचा आवाज माझ्या अंतर्मनापर्यंत पोचत होता.
आ. ते बोलत असतांना ‘साक्षात् श्री सरस्वतीदेवी त्यांच्यात वास करत आहे आणि त्यांचे ज्ञान दैवी अन् अमृतासमान आहे’, असे मला जाणवले.’
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२२)
वेदांचे जणू अमृतमय भंडार भरलेले ।पू. डॉ. शिवकुमार ओझा यांच्या मार्गदर्शनानंतर मी रात्री झोपले. त्यानंतर मला मध्यरात्री २ वाजता जाग आली आणि कवितेच्या पुढील ओळी सुचल्या. अंतःकरणाने, अंतःप्रेरणेने । ऋषीमुनींनी जपून ठेवलेले । पू. ओझाकाकांनी उलगडलेली अक्षरे । जणू वेदच बोलती त्यांच्या मुखातून । ऋषीमुनींना न पाहिले आम्ही । पू. काकाच असती जणू वेदर्षि । मन असे निर्मळ । रूप जणू प्रीतीमय । चैतन्याची खाण । वाणी असे छान । श्रीमन्नारायण चरणी । कृतकृत्य होऊ अर्पूनी । पेटीत ठेवू ना जपूनी माळ । पू. काका आहेत ना महान । धन्य धन्य आजचा दिवस । कृपा असे गुरुमाऊलींची ।। ८ ।। दर्शन लाभे साधकजनांसी । टीप १ – पू. डॉ. शिवकुमार ओझा – सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२२) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |