लिज ट्रस ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान

ब्रिटनच्या पंतप्रधान लिज ट्रस

लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधान म्हणून लिज ट्रस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ४७ वर्षांच्या ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान असणार आहेत. लिज ट्रस यांनी ५७ टक्के मते मिळवत त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्यावर मात केली. ट्रस यांना ब्रिटनच्या राजकारणातील ‘फायरब्रँड’ (आक्रमक प्रवृत्तीच्या) नेत्या म्हणून ओळखले जाते. ट्रस या ब्रिटनच्या तिसर्‍या महिला पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्यापूर्वी मार्गारेट थेचर आणि थेरेसा मे यांनी ब्रिटनचे पंतप्रधानपद भूषवले आहे. ट्रस या मार्गारेट थेचर यांना त्यांच्या आदर्श मानतात.