आसाममध्ये मौलवीच्या रूपात आतंकवादी लपले आहेत ! – आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंता

(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंता

गौहत्ती (आसाम) – राज्यात मौलवींच्या वेशात आतंकवादी लपले आहेत आणि ते देशविरोधी कारवाया करत आहेत, असे विधान आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंता यांनी केले आहे. त्यांनी राज्यातील विविध इस्लामी संस्थांच्या प्रमुखांशी भेट घेऊन त्यांना आतंकवाद्यांचा उघडे पाडण्यासाठी साहाय्य करण्याचे आवाहन केले. (जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या इस्लामी संस्थांवरही कारवाई झाली की, अन्य संस्था आपसूकच पोलिसांना साहाय्य करतील ! – संपादक) गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यात अल्-कायदा आणि ‘अंसारुल्लाह बांग्ला टीम’ या आतंकवादी संघटनांशी संबंधित काही आतंकवाद्यांना अटक केलेली आहे. एकूण ३८ जणांना अटक करण्यात आलेली आहे. हे आतंकवादी आसाममधील मशिदींमध्ये इमाम किंवा मौलवी यांचे काम करत होते. त्या पार्श्‍वभूमीवर महंता यांनी आवाहन केले आहे.

संपादकीय भूमिका

‘जिहादी आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे आता काहीच बोलत नाहीत; कारण त्यांचा खोटारडेपणा केव्हाच उघड झाला आहे. हिंदूंना आणि त्यांच्या संतांना ‘आतंकवादी’ ठरणारे राजकीय पक्ष संपण्याच्या मार्गावर आहेत, हे लक्षात घ्या !