काबुल (अफगाणिस्तान) येथील रशियाच्या दूतावासाबाहेरील बाँबस्फोटात २० जण ठार
काबुल (अफगाणिस्तान) – येथे ५ सप्टेंबरच्या दिवशी रशियाच्या दूतावासाबाहेर करण्यात आलेल्या आत्मघाती आक्रमणात २० हून अधिक जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये २ जण दूतावासाचे अधिकारी आहेत. जिहादी आतंकवाद्यांनी स्वतःला उडवून येथे स्फोट घडवून आणला. प्राथमिक माहितीनुसार आतंकवादी त्यांच्या लक्ष्यित स्थळी पोचण्यापूर्वी दूतावासाबाहेरील सुरक्षारक्षकांनी त्याला गोळ्या घालून ठार केले; मात्र त्यापूर्वी त्याने स्फोट घडवून आणला. यापूर्वी वर्ष २०१६ मध्येही या दूतावासाबाहेर स्फोट झाला होता. तेव्हा १२ जण ठार आणि २० जण घायाळ झाले होते.
अफगानिस्तान की राजधानी काबुल में रूसी दूतावास के बाहर बम धमाके में 20 लोगों की मौत हो गई. मारे गए लोगों में दो रूसी राजनयिक भी शामिल हैं.#Afghanistan #Kabul #Russia https://t.co/E3utcFtg22
— Zee News (@ZeeNews) September 5, 2022