करावा कृपावर्षाव प्रार्थना ही मज मूढमतीची ।
अधर्म बहू बळावला सर्वत्र ।
नसे साधकां आधार कुणी ।।
भ्रष्टाचारी दुराचारी माजती सर्वत्र ।
पापभारे कष्टी जाहली धरणी ।। १ ।।
जनपालक राजा नसे कुणी ।
प्रजेसही न आवडे वेदवाणी ।।
भोगिती कष्ट साधक अपार ।
कलियुगी नसे तयां आधार ।। २ ।।
ऐसी स्थिती पहाता नयनी ।
गुरुदेवांस वाटे अनुकंपा मनी ।।
म्हणोनी उचलती शिवधनुष्य ते ।
ईश्वरी राज्य स्थापनेचे ते ।। ३ ।।
विघ्ने दूर करण्या ईश्वरी राज्य स्थापनेतील ।
निर्मिली मूर्ती विघ्नहरा तुझी ।।
प्रगटले तत्त्व तुझे भूवरी ।
झाले कृपामय साधक पाहोनी मूर्ती तुझी ।। ४ ।।
साकारले मूर्तीतूनी तत्त्व तुझे ।
साधक होती भावविभोर ।।
सिद्धिविनायक वरदविनायक रूप तुझे ।
वर्षती साधकांवरी कृपासागर ।। ५ ।।
सत्ययुगी तू महोत्कट-विनायक ।
गुणेश (टीप) तू त्रेतायुगी ।।
द्वापारे असशी तू गजानन ।
अवतरलास धूम्रवर्णे कलियुगी ।। ६ ।।
आलो शरण देवा आता ।
हरावी संकटे साधनापथीची ।।
गुरुमूर्ती गणराजमूर्ती आम्हांस एक आता ।
करावा कृपावर्षाव प्रार्थना ही मज मूढमतीची ।। ७ ।।
टीप – सनातन संस्थेचे प्रकाशन ‘देवतांची उपासना : श्री गणपति – खंड १’ या ग्रंथातील ‘सूत्र क्र. ७ – युगांनुसार अवतार’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |