पुणे शहरात अनंत चतुर्दशीला ‘निर्माल्य संकलन मोहीम’!
पुणे – ‘सकाळ सोशल फाऊंडेशन’, ‘कृष्णकुमार गोयल फाऊंडेशन’ आणि ‘कोहिनूर ग्रुप’ यांच्या सौजन्याने अनंत चतुर्दशी म्हणजेच ९ सप्टेंबर या दिवशी शहरातील प्रमुख ५ विसर्जन घाटांवर निर्माल्य संकलन मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक घाटावर २० याप्रमाणे १०० स्वयंसेवक यामध्ये सहभागी होणार आहेत. मुठा नदीवरील सिद्धेश्वर-वृद्धेश्वर घाट, भिडे पूल, पांचाळेश्वर घाट, एस्.एम्. जोशी घाट (नदीकडील दोन्ही बाजू) या ठिकाणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेला महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहकार्य लाभणार आहे.
उंड्री (पुणे) येथील ‘गंगा व्हिलेज सोसायटी’च्या प्रवेशद्वारावर निर्माल्य स्वीकारण्याचा उपक्रम
‘प्रदूषण टाळा’, ‘नद्या, नाले, कालवा, विहिरी स्वच्छ ठेवण्याचे दायित्व माझे आहे. त्यामध्ये निर्माल्य टाकू नका’, असे आवाहन सातवनगर-हांडेवाडी रस्ता येथील ‘गंगा व्हिलेज सोसायटी’चे अध्यक्ष योगेंद्र गायकवाड यांनी केले आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर गणेशोत्सवाच्या काळात ओले आणि सुके असे दोन्ही प्रकारचे निर्माल्य स्वीकारले जाईल, ‘झिरो वेस्ट’ या उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन गायकवाड यांनी केले आहे.
संपादकीय भुमिका
|