डांबर अल्प टाकल्याने रस्त्यांची दुरवस्था ! – पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महापालिका
सोलापूर शहरातील ८ रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची; ५ मक्तेदारांना नोटीस देणार !
सोलापूर – शहरातील ३१ रस्त्यांतील ८ रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे संबंधित मक्तेदारांना ते रस्ते नव्याने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले. संबंधित ५ मक्तेदारांना नोटीस बजावण्यात येणार आहे. ‘मक्तेदारांकडून निकृष्ट काम झालेल्या ८ रस्त्यांचे पुन्हा नव्याने काम करून घेणार आहे. यासाठी त्यांनी नकार दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने ३१ रस्त्यांची पडताळणी केली. त्यातील १८ रस्ते संशयित आढळले. यातील १० रस्ते तिसर्या चाचणीमध्ये दुरुस्त करण्यात आले. अन्य ८ रस्ते निकृष्ट असून, ते पुन्हा नव्याने करण्यात येणार आहेत. ३ मासांपूर्वीच हे रस्ते करण्यात आले होते. (महापालिकेने रस्त्यांचे काम चालू असतांनाच ते उत्कृष्ट पद्धतीने होत आहे ना ? हे पहाणे आवश्यक होते. तसे का झाले नाही ? हेही पहाणे आवश्यक आहे ! – संपादक)
मक्तेदार आणि शहरातील निकृष्ट रस्ते
शहरातील प्रभाग क्रमांक २,९, २२, २३, २४ मधील रस्त्यांचे काम डांबर अल्प वापरल्यामुळे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. विजय कन्स्ट्रक्शन, वैष्णवी कन्स्ट्रक्शन, पी.एच्. भरले, सचिन भोसले, ए.के. कन्स्ट्रक्शन अशी ५ मक्तेदारांची नावे आहेत.
संपादकीय भूमिका
|