धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !
सत्य समोर आल्यानंतर तरुणीच्या वडिलांचा शिरच्छेद करण्याची धमकी
बागपत – उत्तरप्रदेशच्या बागपत जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक ताजे प्रकरण समोर आले आहे. रईस नावाच्या एका मुसलमान तरुणाने स्वतःचे ‘विकास’ नाव सांगून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर तो तिचा लैंगिक छळ करू लागला. रईस मुसलमान असल्याचे सत्य मुलीला समजल्यानंतर तिने त्याच्याशी संबंध तोडले. तेव्हा रईसने मुलीच्या वडिलांना शिरच्छेद करण्याची आणि मुलीचे अपहरण करण्याची धमकी दिली.
पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रईसच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. यापूर्वीही पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून रईस याला अटक करण्यात आले होते. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे, अशी माहिती बागपतचे पोलीस अधीक्षक नीरज कुमार यांनी दिली.