काश्मीरमध्ये मशिदीच्या मौलवीला अटक !
भारतीय सैन्याची गोपनीय माहिती जिहादी आतंकवादी संघटनेला पुरवली !
(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)
किश्तवाड (जम्मू-काश्मीर) – येथील एका मशिदीच्या २२ वर्षीय मौलवीला पाकिस्तानी आतंकवादी संघटनेला गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. अब्दुल वाहिद असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानमधील आतंकवादी संघटना ‘कश्मिरी जांबाज फोर्स’ला भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवत होता. भारतीय सैन्याच्या गुप्तचर विभागाला त्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना कळवल्यावर वाहिद याला अटक करण्यात आली. वाहिद याने त्याचा गुन्हा स्वीकारला आहे. वाहिद एका मदरशामध्ये शिकवण्याचेही काम करतो. (येथील मुलांना त्याने काय शिकवले आहे, याचाही आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. अशाच घटनांमुळे देशातील मदरसे कायमचे बंद करण्यात आले पाहिजेत, असे राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक) विशेष म्हणजे किश्तवाड येथून जिहादी आतंकवादी मोठ्या प्रमाणात काश्मीरमध्ये घुसखोरी करतात.
ISI agent arrested from Jammu and Kashmir’s Kishtwarhttps://t.co/KQMbgnVGXj
— The Indian Express (@IndianExpress) September 3, 2022
वाहिद याने चौकशीत सांगितले की, डिसेंबर २०२० मध्ये तो फेसबूकद्वारे तैयब फारूकी उपाख्य उमर खताब या कश्मिरी जांबाज फोर्सच्या कमांडरच्या संपर्कात आला होता. त्यानंतर तो पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.शीही जोडला गेला. नंतर त्याने त्याचे संपर्क क्रमांक त्यांना दिले होते.
संपादकीय भूमिका
|