हिदूंसाठी ‘टूल किट’ !

हिंदूंनो, तुमच्या विरोधात चालू असलेल्या षड्यंत्राच्या विरोधात धर्मसंघटन हाच एकमेव उपाय आहे, हे आतातरी लक्षात घ्या !

केंद्रशासनाने सप्टेंबर २०२० मध्ये संसदेत संमत केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात देहलीतील सीमेवर शेतकर्‍यांकडून आंदोलन चालू करण्यात आले होते. याला पाठिंबा देतांना आंदोलनाची दिशा कशी ठेवायची, याचा आराखडा बनवण्यात आला होता. हाच नंतर ‘टूल किट’ म्हणून स्वीडनमधील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्न हिच्या माध्यमातून समोर आला होता. त्यातून शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या नावाखाली भारतविरोधी कारवाया करण्याचे षड्यंत्र उघड झाले होते. यातून ‘टूल किट’ हे नाव देशात प्रसिद्ध झाले. याच धर्तीवर हिंदूंनीही राष्ट्र आणि धर्म प्रेमी कृती करण्यासाठी त्यांचे ‘टूल किट’ सिद्ध करायला हवे. अशा प्रकारचे एक प्रातिनिधीक ‘टूल किट’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ते येथे देत आहोत.

१. स्वतःला हिंदुत्वाच्या कार्याला वाहून घ्या. त्यासाठी तुमचे प्रयत्न केवळ मातृभाषा आणि राज्य येथपर्यंतच मर्यादित ठेवू नका. लक्षात ठेवा, जेव्हा देशविरोधी आणि हिंदु धर्म विरोधी शक्ती तुमच्यावर आक्रमण करतील, तेव्हा ते आक्रमण ‘तुम्ही हिंदू आहात’ म्हणूनच होईल. तुमची जात अथवा भाषा काय आहे, हे या शक्ती पहाणार नाहीत. ख्रिस्त्यांना सर्वांत मोठे भय हे हिंदूऐक्याचे आहे; म्हणूनच ते भारतातील हिंदूंमध्ये प्रांत, जात आणि भाषा या स्तरांवर फूट पाडतात. जम्मू, पश्चिमी उत्तरप्रदेश, बंगाल अथवा केरळ, तसेच बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंवर होणारे अत्याचार जगातील सर्व हिंदूंसाठी काळजी करण्यासारखे आहे. लक्षात ठेवा, जर आपण आज आवाज उठवला नाही, तर एक दिवस या विघातक शक्ती तुमच्यापर्यंत पोचतील आणि मग आवाज उठवायला कुणी शिल्लकच उरणार नाही.

२. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या संपर्कात रहा. ते तुम्हाला आवश्यकता पडल्यास साहाय्य करू शकतील आणि तुम्हाला प्रेरणा देऊ शकतील.

३. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये दिलेल्या संदेशात फार मोठा अर्थ दडला होता. ‘आपल्याला जेवढ्या लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर इस्लामला शह देणे आवश्यक आहे. इस्लामने केवळ या देशातच नव्हे, तर जगात कठीण परिस्थिती निर्माण केली आहे’, असे ते म्हणाले होते.

४. तुमचा इतिहास आणि धर्मग्रंथ वाचा. हिंदु धर्मावर होणार्‍या खोट्या टीकेला मोठ्या चतुराईने आणि ठामपणे प्रत्युत्तर द्या. सर्व वादविवाद आणि चर्चा यांमध्ये भाग घ्या. सनातन धर्माची मूळ तत्त्वे समजून घ्या.

५. हिंदूंचे सर्व सण आणि उत्सव उत्साहाने साजरे करा. कुणी हिंदु म्हणून तुमची हेटाळणी करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करा. ‘मी हिंदु आहे’ असे स्वाभिमानाने सांगा. भारतीय वेश परिधान करणे, कपाळावर टिळा अथवा कुंकू लावणे, हातात बांगड्या अथवा सांस्कृतिक दागिने घालणे, हे तुमच्या धर्माप्रती सन्मान राखणे आहे. उगाच बचावात्मक पवित्रा घेऊ नका, ठासून वागा.

६. स्वतःत पालट करू नका. सन्मानाने जगा. सहृदय व्हा. कुठल्याही व्यक्तीचे परीक्षण ती कुठल्या धर्माची आहे, कोणत्या परंपरा पाळते यांवर करू नका. थोडक्यात चांगले हिंदू व्हा; मात्र जेव्हा हिंदू म्हणून ओळख द्यायची असेल, तेव्हा ताठ मानेने उभे रहा. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप इत्यादी राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचा.

७. निवडणुकीत तुमच्या मताचा शहाणपणाने वापर करा. जे लोक ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या घरी जातात अथवा जे हुतात्मा सैनिक आणि पोलीस यांच्या घरांना भेटी देतात, त्यांच्यातील भेद जाणून घ्या. महत्त्वाचे म्हणजे जे पक्ष फुकट बक्षिसे वाटतात, त्यांना मते देऊ नका. यामुळेच देहली राज्यातील जनता फसली. तुमची स्थिती तशी होऊ देऊ नका.

हिंदूंनी सर्व स्तरांवरील राजकारणात सहभाग घ्यावा. ज्या व्यक्ती वरील पालट घडवून आणण्यात साहाय्य करतील, त्यांना निवडून आणा. १०० कोटी हिंदूंची एक प्रचंड मतपेटी आहे. त्याचा वापर करणे आपल्यासारख्या सबाह्य लोकांचे काम नाही; मात्र जेव्हा आपले अस्तित्वच धोक्यात येते, तेव्हा निरुपाय होतो.

८. हिंदु धर्माचा अवमान आणि विडंबन करणारे चित्रपट, दूरदर्शन मालिका, ब्लॉगर, लेखक, कलाकार, राजकारणी, अभ्यासक्रमातील पुस्तके, शाळा, विज्ञापने आणि सामाजिक माध्यमे यांचा पुरेपूर सामना करा. त्यांचा जोरदार निषेध करा.

ज्या हिंदूंना धर्मावर आलेल्या संकटाची जाणीव नाही आणि जे चित्रपटात दिसते, त्याचाच स्वीकार करतात, त्यांना जागे करून संघटित करा !

(संदर्भ : सामाजिक माध्यमांतून प्रसारित झालेला लेख)