अकोला येथील ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात श्रीफळ अर्पण करून धर्मप्रेमींनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ
हिंदु जनजागृती समितीची द्विदशकपूर्ती !
अकोला, ३ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला येत्या घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर या दिवशी २० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने समिती आगामी दोन मास ‘हिंदु राष्ट्र संकल्प मास’ साजरे करणार आहे.
समितीच्या या कार्याला देवतांचे आशीर्वाद लाभावेत या उद्देशाने २ सप्टेंबर या दिवशी सकाळी अकोला येथील श्री राजराजेश्वर मंदिरात समितीचे कार्यकर्ते आणि अन्य धर्मप्रेमी भाविक यांनी एकत्र येऊन देवतेला श्रीफळ अर्पण केले. त्यानंतर ह.भ.प. गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थितांकडून हिंदु धर्मावर होणारे आघात, हिंदु देवतांचे होणारे विडंबन या विरोधात लढण्याची, महिला आणि गोमाता यांचे रक्षण करण्याची, त्यासाठी आवश्यक असे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटिबद्ध रहाण्याची प्रतिज्ञा म्हणून घेतली.
क्षणचित्रे
१. उपस्थितांपैकी श्री. नंदकिशोर हागे या युवकाने पूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण केले आणि त्याच्या ‘वन्दे मातरम्’ या व्हॉट्सॲप गटावर पाठवले.
२. श्री. भगवान पंढरी ठाकरे यांनी समितीच्या प्रसारकार्याला शुभेच्छा दिल्या आणि स्वतः सेवेत सहभागी होणार असल्याचे सांगितले.