आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार ! – सचिन कल्याणशेट्टी, आमदार, भाजप
सोलापूर, ३ सप्टेंबर (वार्ता.) – अक्कलकोट मतदारसंघातील भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याविषयी ‘सोलापूर श्रमिक पत्रकार संघटने’च्या वतीने वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कल्याणशेट्टी म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना समवेत घेऊन जिल्ह्यात शत प्रतिशत भाजप करण्याचा मानस आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असून जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाविषयी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जातील.’’