‘गायत्री धाम’चे मुख्य व्यवस्थापक पंडित मेवालाल यांना सनातनचा ग्रंथ भेट !
जळगाव – निसर्गोपचार, योग, ध्यान, आयुर्वेद अशा सर्व भारतीय चिकित्सा पद्धतींचा अभ्यास असणारे आणि त्यानुसार गेली अनेक वर्षे लोकांवर यशस्वी उपचार करणारे सेंधवा (मध्यप्रदेश) येथील ‘गायत्री धाम’चे मुख्य व्यवस्थापक पंडित मेवालालजी पाटीदार यांची हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. पं. पाटीदार हे श्री पद्मालय देवस्थान, एरंडोल, जळगाव येथे कार्यक्रमानिमित्त आले होते. या वेळी त्यांना सनातनचा ‘आपातकालमें जीवित रहने हेतु दैनिक आवश्यकताओंकी व्यवस्था करें !’ हा आपत्कालविषयक ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी समितीचे श्री. विनोद शिंदेही उपस्थित होते.