बदायू (उत्तरप्रदेश) येथील जामा मशीद पूर्वीचे नीलकंठ महादेव मंदिर ! – दिवाणी न्यायालयात पुराव्यांसह याचिका प्रविष्ट
बदायू (उत्तरप्रदेश) – येथील जामा मशीद पूर्वीचे नीलकंठ महादेव मंदिर असल्यावरून येथील दिवाणी न्यायालयात याविषयी याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. एकूण ५ पक्षकारांनी मिळून ही याचिका प्रविष्ट केली आहे. हिंदु महासभेचे प्रदेश संयोजक मुकेश पटेल हे यात एक याचिकाकर्ते आहेत. न्यायालयाने विरोधी पक्षाला नोटीस बजावून त्यांचे मत मागवले आहे. जामा मशीद पूर्वी हिंदु राजा महीपाल यांचा गड होता आणि त्याच ठिकाणी आता नीळकंठ मंदिर आहे. या याचिकेद्वारे मशिदीचे सर्वेक्षण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मंदिर तोडून येथे मशीद उभारण्यात आल्याचे यात म्हटले आहे. येथे एकाच वेळी २३ सहस्र लोक नमाजपठण करू शकतात.
अखिल भारत हिंदू महासभा ने यूपी के बदायूं की जामा मस्जिद शम्सी की जगह नीलकंठ महादेव मंदिर होने का दावा किया है #UttarPradesh https://t.co/TBLeRRBJV2
— AajTak (@aajtak) September 3, 2022
१. याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता वेद प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही या संदर्भातील सर्व पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.
२. जामा मशीद इंतजामिया कमिटी, उत्तरप्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड, उत्तरप्रदेश पुरातत्व सर्वेक्षण विभाग, उत्तरप्रदेश सरकार आणि केंद्र सरकार यांनाही त्यांचे मत मांडण्यास सांगण्यात आले आहे.