पुलवामा येथे बंगाली कामगारावर आतंकवाद्यांकडून गोळीबार
पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथे एका कामगारावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाला. घायाळ झालेल्या कामगाराचे नाव मुनिरुल इस्लाम असे असून तो बंगालचा रहिवासी आहे. गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार लक्ष्य करून ठार करणे, ही काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तानची नवी योजना आहे. कलम ३७० रहित केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या योजनांना उद्ध्वस्त करणे हा त्याचा उद्देश आहे.