राज्यभरात हलालविरोधी कृती समिती स्थापन करून ‘हलाल सक्ती’ला विरोध करणार ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक
नागपूर येथे हलालविरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्धार !
नागपूर, २ सप्टेंबर (वार्ता.) – भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना देशात हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून धर्माच्या नावावर समांतर अशी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’ निर्माण केली जात आहे. या हलाल अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला, तसेच राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. अशा हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी येथील ‘टिळक पत्रकार भवना’त आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभेचे सभापती श्री. श्यामसुंदर सोनी, अखिल भरतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री. आनंद घारे, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आदी उपस्थित होते.
हलालच्या माध्यमातून उभी रहाणारी अर्थव्यवस्था ही राष्ट्रासाठी धोक्याची घंटा ! – सभापती, अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभाहलाल प्रमाणपत्राविषयी समाजात जागरूकता नाही. त्यामुळे अनेक आस्थापने आवश्यक नसतांनाही कोट्यवधी रुपये व्यय करून हलाल प्रमाणपत्र घेत आहेत. त्याचा प्रत्यक्ष भुर्दंड सामान्य हिंदूंवर पडतो आहे, तसेच हलाल मांस सक्तीमुळे खाटिक समाजावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. मुसलमानांमध्ये व्याज घेणे ‘हराम’ आहे. हलालच्या माध्यमातून २ ट्रिलीयनहून अधिक पैसा उभा रहात आहे, हे हिंदु समाज आणि त्यांचा व्यापार यांसाठी धोक्याची घंटा आहे. या वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या माध्यमातून समाजात ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जनजागृती करणार आहोत, असे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र राज्य सचिव आनंद घारे यांनी सांगितले. |
क्षणचित्र
या वेळी ध्वनीचित्रफीत आणि ‘पीपीटी’ या माध्यमांतून पत्रकारांना विषय समजावून सांगण्यात आला.