आसाममध्ये अल् कायदाच्या आणखी एका आतंकवाद्याला अटक
गौहत्ती – आसामच्या गोलपाडा जिल्ह्यात अजमल हुसेन नावाच्या अल् कायदाच्या आणखी एका आतंकवाद्याला नुकतीच अटक करण्यात आली. त्याने गौहत्ती येथील त्याच्या घरात अल् कायदाचे सदस्य असलेल्या बांगलादेशी आतंकवाद्यांना आश्रय दिला होता. आसाममध्ये आतापर्यंत ‘अल् कायदा भारतीय उपखंड’ आणि ‘अन्सारउल्ला बांगला टीम’ या आतंकवादी संघटनांशी संबंधित ३८ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
१. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या एका वृत्तानुसार अजमल हुसेन याने आतंकवाद्यांना आश्रय दिल्याची स्वीकृती दिली आहे. तसेच त्याने आसाममधील बारपेटा जिल्ह्यात अल् कायदाकडून प्रशिक्षण घेतल्याचे स्वीकारले आहे.
२. सध्या आसाम पोलिसांनी आतंकवादी कारवायांच्या संदर्भात राज्यातील अनेक मदरसे आणि मशिदी उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील एक मदरसा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. (आतंकवादाचे अड्डे ठरलेले मदरसे उद्ध्वस्त करणार्या आसाम सरकारचे आतंकवादग्रस्त अन्य राज्य सरकारांनी अनुकरण करावे, हीच राष्ट्राभिमानी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक)