प्रयागराजच्या संगमावर नौकेमध्ये मांसाहार करणार्या धर्मांधांवर गुन्हा नोंद : तिघांना अटक
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर नागवासुकी मंदिराच्या जवळ काही जण नौकेत बसून मांसाहार आणि हुक्का ओढत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन ८ जणांवर गुन्हा नोंदवून तिघा धर्मांधांना अटक केली.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याची एकही संधी न सोडणारे धर्मांध ! याविषयी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |