पू. कै. (सौ.) शालिनी मराठे यांचे अंत्यदर्शन घेतांना त्यांच्याविषयी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी आलेली अनुभूती
‘१६.७.२०२२ या दिवशी पू. कै. (सौ.) शालिनी मराठे यांचे अंत्यदर्शन घेतांना मी प्रार्थना करण्यासाठी डोळे मिटल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. कै. (सौ.) मराठेकाकू दिसत होत्या. डोळे उघडल्यावर मला केवळ मराठेकाकूंचे पार्थिव दिसत होते. त्यांचे दर्शन घेतांना ‘त्यांचा श्वास चालू असून श्वासोच्छ्वासाच्या वेळी जसे पोट हलते, तसे त्यांचे पोट हलत आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे तिथे त्यांचे पार्थिव नसून त्या जिवंत आहेत’, असे मला वाटले.’
– सौ. मनीषा पिंपळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |