गोरेगाव येथे गुटख्याची वाहतूक करणार्या धर्मांधाला अटक !
८८ लाखांचा गुटखा कह्यात
मुंबई – गुन्हे शाखेने ३१ ऑगस्ट या दिवशी गोरेगाव येथे एका धर्मांधाला अटक करून त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेला ८८ लाख रुपयांचा गुटखा कह्यात घेतला. सफन साहब मौल्ला साहब शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी लिलियानगर येथे गुटख्याचा ट्रक घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार सापळा रचून ही कारवाई केली.
कायद्यानुसार महाराष्ट्रात गुटखा निर्मिती, वितरण आणि विक्री यांवर बंदी आहे. गुटखा आणि त्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेला ट्रक असा एकूण १ कोटी ८ लाख रुपयांचा माल कह्यात घेण्यात आला आहे. या कामात शेख याला साहाय्य करणारा सिद्धू शिवयोजप्पा पुजारी यालाही अटक करण्यात आली आहे.