तणावमुक्तीसाठी साधना करणे हाच सर्वाेत्तम उपाय ! – धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती
मूझफ्फरपूर (बिहार) – सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती तणावग्रस्त आहे आणि तिला शिक्षकही अपवाद नाहीत. आपण तणावमुक्तीसाठी करत असलेले उपाय तात्कालिक असतात. त्यामुळे नेहमी आनंदी रहाण्यासाठी साधना करणे, हाच सर्वाेत्तम उपाय आहे. साधना म्हणून नामजप केल्याने हळूहळू अंतर्मनातील विद्यमान तणाव न्यून होत जातो आणि व्यक्ती आनंदी होते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थित शिक्षकांना केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ब्रह्मपुरामधील प्रसिद्ध ‘एशियन स्कूल’मध्ये ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्माची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा ४० शिक्षकांनी लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. ‘आमच्या विद्यालयामध्ये यापुढेही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करावेत’, अशी विनंती शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल कुमार यांनी केली.
२. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थितांना कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व विशद केले.