मुसलमानांनी स्वतःची मुले सांभाळावी अन्यथा ‘जशास तसे’ उत्तर देऊ !
अमरावती येथील लव्ह जिहादच्या घटनेनंतर भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांची चेतावणी !
अमरावती – जिल्ह्यातील धारणी येथे रुग्णवाहिकेचा चालक असणार्या धर्मांधाने येथील उच्च विद्याविभूषित हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला ३ दिवस घरात डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. या तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या तरुणीसमवेत धर्मांधाने अनधिकृतपणे विवाह केला असून हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण आहे, असे मत येथील भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी ३१ ऑगस्ट या दिवशी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे. ‘शहरातील मुसलमानांकडून सातत्याने हिंदूंच्या मुलींना लक्ष केले जात असून मुसलमानांनी स्वतःची मुले सांभाळावी अन्यथा ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी आम्हीही मागे हटणार नाही’, असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी चेतावणी दिली आहे.
सौजन्य : ABP MAJHA
पीडित हिंदु मुलीच्या कुटुंबियांना सर्वंकष साहाय्य करणार !
डॉ. अनिल बोंडे म्हणाले, ‘‘धर्मांधाने हिंदु तरुणीला विश्वासात घेत शहरातील ‘चंद्रविला’ या ट्रस्टकडून अवैधरित्या विवाह लावून घेतला. पीडित तरुणी आणि तिचे नातेवाईक यांची भेट घेतली असून पीडित तरुणीच्या प्रकृतीविषयी विचारणा केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पीडित मुलीच्या कुटुंबियांना सर्वर्ंकष साहाय्य करणार आहे. माझी सर्व मुसलमान बांधवांना विनंती आहे की, स्वतःची मुले सांभाळा. ते जर हिंदूंच्या मुलींना फसवून विवाह करत असतील, तर त्यांचे गंभीर परिणाम होतील.’’
गत २ वर्षांत ‘लव्ह जिहाद’च्या २० प्रकरणांत शेकडो मुली बेपत्ता !खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे पुष्कळ प्रमाणात वाढत आहेत. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या पदाधिकार्यांच्या सतर्कतेने धारणी येथील प्रकाराला लगेच आळा घालण्यात यश आले. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांची भूमिकाही संशयास्पद आहे. (राज्यात खासदार बोंडे यांच्याच पक्षाचे सरकार असल्याने त्यांनी अशा पोलिसांची चौकशी करण्यासाठी सरकारला सांगावे ! – संपादक) गत २ वर्षांत ‘लव्ह जिहाद’च्या २० प्रकरणांमध्ये अनेक मुली बेपत्ता झाल्या आहेत. अशा प्रकरणांवर वेळीच पायबंद न घातल्यास, तर हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त होईल. त्यामुळे पालकांनीही अशा प्रकरणात सजग राहून काम करावे. हिंदु मुलींनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन डॉ. बोंडे यांनी केले आहे. |
संपादकीय भूमिका
|