बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहावे ! – प्रकाश दास, अध्यक्ष, ‘पश्चिम बंगेर जन्य’

हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष संवाद :  ‘बंगालच्या हिंदूंची वर्तमान स्थिती !’

श्री. प्रकाश दास

मुंबई – वर्ष १९४६ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ‘डायरेक्ट एक्शन डे’च्या (हिंदूंच्या विरोधात थेट कृती करण्याचा दिवस) अंतर्गत मुसलमानांनी बंगाल प्रांत आणि तेव्हाचा पूर्व बंगाल (आताचा बांगलादेश) येथे हिंदूंवर आक्रमणे केली. तेव्हापासून ते आजपर्यंत या भागात हिंदूंवर आक्रमणे चालूच आहेत. मुसलमानांच्या आक्रमणांवर हिंदू प्रतिकार करत आहेत; मात्र राज्य सरकारची दमननीती हिंदूंना रोखत आहे. असे असले, तरी हिंदू जागृत होऊन लढा देत आहेत. बंगालमधील सध्याची स्थिती इस्लामी राष्ट्रासारखी झाली आहे. बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती देशातील अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहाणे आवश्यक आहे, असे आवाहन कोलकाता (बंगाल) येथील ‘पश्चिम बंगेर जन्य’चे अध्यक्ष श्री. प्रकाश दास यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बंगालच्या हिंदूंची वर्तमान स्थिती !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

श्री. प्रकाश दास पुढे म्हणाले की,

१. बांगलादेशाची सीमा बंगालसह भारताच्या ५ राज्यांना लागून आहे आणि या सर्व राज्यांत बांगलादेशींची घुसखोरी चालूच आहे. बंगाल राज्य आता एक ‘स्लीपर सेल’ झाले आहे.

२. घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून येथे राहू दिले जाते; मात्र बांगलादेशातून नाईलाजाने स्थलांतरित झालेल्या हिंदूंकडे दुर्लक्ष केले जाते.