वांद्रे येथे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ५२ फुटी पशुपतिनाथ मंदिराची प्रतिकृती
मुंबई, २९ ऑगस्ट (वार्ता.) – प्रतिवर्षी प्रसिद्ध मंदिरांची हुबेहुब आरास साकारणार्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा नेपाळ देशातील काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची ५२ फूट उंच हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार हे या मंडळाचे प्रमुख सल्लागार आहेत.