बेळगाव सीमावाद प्रश्नाची सर्वाेच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर; पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये
देहली – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर सर्वाेच्च न्यायालयात ३० ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. या सुनावणीत कर्नाटकच्या अधिवक्त्यांनी वेळ मागितल्याने पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. न्यायमूर्ती जोसेफ यांच्या त्रिसदस्यीय खंडपिठापुढे ही सुनावणी होत आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने न्यायालयात अधिवक्ता राकेश द्विवेदी आणि शिवाजीराव जाधव हे उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिवक्त्यांशी दूरभाषवर संपर्क साधून आणि ‘महाराष्ट्राची बाजू सर्वाेच्च न्यायालयात भक्कमपणे मांडा’, असे सांगितले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने वर्ष २००४ मध्ये सर्वाेच्च न्यायालयात दावा प्रविष्ट केला आहे. या दाव्यानुसार ८६५ गावावर आपला अधिकार सांगितला आहे. आज दीर्घकाळाने सुनावणी झाली; मात्र तीही लांबणीवर पडली.