गोव्यात विक्रीसाठी असणार्या मद्याच्या अवैध वाहतुकीवर धाड : सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर – केवळ गोव्यात विक्रीसाठी असणार्या मद्याच्या अवैध वाहतुकीवर धाड टाकत राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने सव्वा दोन लाख रुपयांच्या मद्यासह सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्ले गावच्या सीमीत ही कारवाई केली. या प्रकरणी श्रीकृष्ण कदम याला अटक करण्यात आली असून स्विफ्ट ही चारचाकी गाडीही जप्त केली आहे. (अवैध वाहतूक करणार्यांवर वचक बसेल, अशी कारवाई पोलीस कधी करणार ? – संपादक)