दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथे हिंदु तरुणीशी मैत्री केली म्हणून मुसलमान तरुणाला मारहाण !
दक्षिण कन्नड (कर्नाटक) – येथे एका महाविद्यालयात शिकणार्या महंमद सनिफ या तरुणाने सुलिया नावाच्या एका हिंदु तरुणीशी मैत्री केल्यामुळे त्याला याच महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांनी मारहाण केली. या मारहाणीच्या संदर्भात पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणार्या तरुणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. दीक्षित, धनुष, प्रज्वस, थनुज, अक्षय, मोक्षित, गौतम अशी यातल्या काही तरुणांची नावे तक्रारीमध्ये देण्यात आली आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदु तरुणींशी मैत्री करून त्यांना नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह करण्याचा आणि नंतर तरुणींचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो, याच्या शेकडो घटना या देशात आतापर्यंत घडल्या आहेत आणि घडत आहेत. त्या रोखण्यासाठी काही राज्यांमध्ये याविरोधात कायदेही बनवण्यात आले आहेत ! |