वडोदरा (गुजरात) येथे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांकडून दगडफेक
१३ जणांना अटक
वडोदरा (गुजरात) – येथे २९ ऑगस्टच्या रात्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येत असलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर हिंसाचार झाला. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘या हिंसाचारात कुणीही घायाळ झालेला नाही’, असे पोलिसांनी सांगितले. रात्री अज्ञात कारणावरून दोन्ही धर्मियांमध्ये वाद होऊन नंतर दगडफेक चालू झाली होती. यात एका मशिदीच्या मुख्य दारावरील काच फुटली. सध्या येथे शांतता आहे.
#Gujarat: Communal clash breaks out during Ganesh procession in Vadodara; 13 detained.https://t.co/RyFUHG4jSB
— TIMES NOW (@TimesNow) August 30, 2022
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर धर्मांधांकडून नेहमीच आक्रमण होते, हे कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! |