गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर विभागाच्या वतीने पुणे येथून ५० अधिक बसगाड्या सोडणार !
सोलापूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) – गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे येथून जे भाविक सोलापूर येथे येतात त्यांच्यासाठी ३० आणि ३१ ऑगस्ट या दिवशी ५० अधिक बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. नियमित धावणार्या गाड्या सोडून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील प्रवाशांसाठी निम्म्या दरात प्रवास, तर ७५ वर्षांहून अधिक वय असलेल्या प्रवाशांना विनामूल्य एस्.टी. प्रवास सुविधा चालू करण्यात आली आहे. २७ ऑगस्ट या दिवशी २ सहस्र ६७४ प्रवासी, तर २८ ऑगस्ट या दिवशी ३ सहस्र ९३४ प्रवाशांनी याचा लाभ घेतला, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली.