राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंद
मुंबई – अमित शहा स्वतः गुन्हेगार आहेत. ते गृहमंत्री असतांना दुसरे काय होणार, अशा आशयाचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहीत पवार यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केले होते. या वक्तव्यावरून भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
मोहित कंबोज यांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच ‘जय श्रीराम’ असे ट्वीट केले होते. त्याचा अर्थ आता स्पष्ट झाला आहे. कंबोज यांनी ‘जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली’ असे दुसरे ट्वीट गुन्हा नोंद झाल्यावर केले आहे.
‘मोहित कंबोज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. तो आता आमच्या विरोधात आरोप करणार का ? निवडणुकीच्या वेळी मालाड येथे पैशाने भरलेल्या गाडीसह मोहित कंबोज सापडला होता; परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सोडून दिले. कंबोज यांचा नातेवाईक ड्रग्ज पेडलर असून नवाब मलिक यांनी त्याचा भांडाफोड केल्यानंतर मलिक यांना जेलमध्ये टाकण्यात आले, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी या सर्व प्रकरणी दिली आहे.