पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात मद्यविक्रीवर बंदी ! – जिल्हाधिकार्यांचे आदेश
पुणे – पुण्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत म्हणजे ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या काळात मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ५ व्या आणि ७ व्या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्यविक्री केली जाते. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशाचा भंग करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. (प्रशासनाने केवळ आदेश काढून आणि कठोर कारवाईचे आदेश देऊन न थांबता त्याची प्रत्यक्ष कार्यवाही होते कि नाही हेही पहावे ! – संपादक) शिवाय अनंत चतुर्थीच्या दिवशीच्या मिरवणुकासंपेपर्यंत त्या मार्गावरील सर्व मद्य विक्रीकेंद्रे बंद असतील.