डोंबिवलीत धुमाकूळ घालणार्या हद्दपार केलेल्या गुन्हेगारास अटक !
ठाणे, २९ ऑगस्ट (वार्ता.) – डोंबिवली पूर्व येथील ठाकुर्ली भागातील कचोरे गाव आणि आसपासचा परिसरात येथे दहशत निर्माण करून दरोडे टाकणारा सराईत गुन्हेगार सिकंदर नुरमहंमद बगाड (वय २२ वर्षे) याला टिळकनगर पोलिसांनी पत्रीपुलाजवळील कचोरे गावाच्या हद्दीतून अटक केली आहे.
सराईत गुन्हेगार असल्याने त्याला ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्या आदेशाचा भंग करून हा गुन्हेगार गुपचूप डोंबिवलीत कचोरे भागात येऊन वास्तव्य करत होता. टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणे, जबरी दुखापत करणे, शस्त्राचा वापर करणे, दरोडा टाकणे, चोर्या करणे असे एकूण १० गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. पुन्हा त्याने गुन्हे करण्यास चालू केले होते.
संपादकीय भूमिकागुन्हेगारांना हद्दरपार करून काही उपयोग होत नाही, हे सिद्ध करणारी घटना ! गुन्हेगारांना कडक शासन करून त्यांची वृत्ती पालटण्यासाठी त्यांना साधना शिकवणे आवश्यक आहे ! धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच ते पुन्हापुन्हा गुन्हे करण्याचे धाडस करत आहेत ! |