सत्तासंघर्षाचा निकाल ५ वर्षे लागण्याची शक्यता नाही ! – भरतशेठ गोगावले, आमदार, शिंदे गट
रत्नागिरी – सत्तासंघर्षाचा निकाल ५ वर्षे लागण्याची शक्यता नाही. सरकार कोसळेल याची काही जण वाट पहात होते; पण यानंतर २०२४ ची निवडणूक आपण जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ, असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी केले आहे. गोगावले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतांना आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकार्याने त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, असे ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना दिलेल्या असतांनाही अनावधानाने त्यांनी हे वक्तव्य केले आहे. वेळ काढण्याचा आमचा हेतू नाही.
न्यायालयांनाही गृहित धरून राजकारण करण्यास काही लोकांनी आरंभ केला आहे. न्यायालयानेच जनतेचा विश्वास टिकवायचा कि नाही हे ठरवायचे आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.