कृत्रिम हौदातील विसर्जित मूर्ती दुसर्या दिवशी वहात्या पाण्यात विसर्जित करू ! – रोहिणी शेंडगे, महापौर, नगर
नगर – श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगर येथील पाणी दूषित असल्यामुळे कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करून दुसर्या दिवशी त्या मूर्ती योग्य अशा ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करू, असे आश्वासन नगर येथील शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिले. कृत्रिम तलाव आणि मूर्तीदान यांसारख्या अशास्त्रीय संकल्पना राबवून श्री गणेशमूर्तींची होणारी विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिल्यानंतर महापौर रोहिणी शेंडगे यांनी वरील आश्वासन दिले.
या वेळी ‘होय हिंदूच’ गटाचे दिनेश हिरगुडे महापौरांना म्हणाले की, स्थानिक मूर्ती विक्रेते मूर्ती विक्री भग्न अवस्थेतील मूर्ती दुसर्या दिवशी त्याच ठिकाणी सोडून जातात. नंतर दुसर्या दिवशी त्या कचर्याच्या गाडीमधून नेल्या जातात.
याविषयी महापौरांनी आश्वासन दिले की, याची नोंद घेतली जाईल. विक्रेत्यांना आमच्या बैठकीमध्ये आदेश देऊ. त्या ठिकाणी कोणताही विक्रेता भग्न अवस्थेतील मूर्ती सोडून जाणार नाही.
या वेळी निवेदन देतांना समितीचे रामेश्वर भुकन, प्रमोद जरे, ‘होय हिंदूच’ गटाचे दिनेश हिरगुडे, नीलेश दातरंगे, विश्वास देशमुख, भूषण सोनवणे आदी उपस्थित होते. या वेळी नगर येथील महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले.