निशिदिनी साधकांसाठी तळमळणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका !
प्रेमळ शांत निगर्वी निर्मळ ।
सद्गुरु काकांचे मनोहारी रूप ।। १ ।।
पहाताच तयां नम्रतेचे भाव उमटती ।
शरण जाता करती कृपा साधकांवरी ।। २ ।।
सान थोर नसे भेद तयां मनी ।
समत्व वसे तयां ठायी ।। ३ ।।
निशिदिनी तळमळती साधकांसाठी ।
करण्या दूर अडथळे तयांच्या साधनेतील ।। ४ ।।
अडचणी असोत साधकांच्या ।
अथवा असोत समष्टी कार्याच्या ।। ५ ।।
सद्गुरु काका असती एकमेव ।
सदैव तत्पर उपाय योजण्या ।। ६ ।।
आध्यात्मिक त्रास असणार्यांसाठी उपायगुरु ।
आध्यात्मिक संशोधनात संशोधकगुरु ।। ७ ।।
कृतज्ञ आहोत आम्ही सद्गुरु काका ।
कोटीशः कृतज्ञता तुमच्या चरणी ।। ८ ।।
वाढदिवसानिमित्त सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कोटीशः कृतज्ञता !
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |