‘५ जी’ सेवा दिवाळीत उपलब्ध होणार ! – मुकेश अंबानी, रिलायन्स समूह प्रमुख
मुंबई – रिलायन्सच्या ५ जी सेवेत २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली आहे. दिवाळीच्या कालावधीमध्ये या सेवेचा शुभारंभ होईल. पहिल्या टप्प्यात देहली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरांमध्ये ही सेवा पुरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.