वीजचोरीच्या प्रकरणी दंड न भरल्याने ३ वीजग्राहकांवर गुन्हा नोंद !
सोलापूर – वीजचोरीच्या २ प्रकरणांत वीजग्राहकांनी दंड भरला नसल्याने ३ घरगुती वीजग्राहकांवर महावितरण आस्थापनाने पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. विजयपूर रस्त्यावरील यामिनीनगर येथील संजय रेवू राठोड, उमेश रेवू राठोड आणि उत्तर सोलापूर येथील सोरेगाव परिसरातील राजेंद्र रेवणसिद्ध भीमदे यांनी वीजचोरी केल्याचे महावितरणच्या फिरत्या पडताळणी पथकाने उघडकीस आणले होते. या तिघांनीही वीजदेयक भरले; परंतु दंडाची रक्कम भरली नसल्याने सदर बाजार पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.