मुसलमानाने हिंदु मुलीचे अपहरण केल्यानंतर जमावाकडून मशिदीवर आक्रमण
देवास (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशच्या देवास जिल्ह्यातील उदयनगर भागात २६ ऑगस्ट या दिवशी फरझान नावाच्या मुसलमान तरुणाने एका हिंदु मुलीचे अपहरण केले. या घटनेनंतर तेथे हिंसाचार उसळला. संतप्त लोकांनी आरोपी फरझान याचे घर आणि गावातील मशीद यांवर आक्रमण करून त्यांची तोडफोड केली. जमावाने गावात मोर्चा काढून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. ‘फरझान याच्यावर गुन्हा नोंदवून प्रकरणाचे अन्वेषण चालू करण्यात आले आहे’, असे पोलिसांनी सांगितले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पीडित मुलीच्या भावाने पोलिसांत तक्रार केली आहे.