‘स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मंडळा’च्या वतीने पुण्यातील शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा !
पुणे, २९ ऑगस्ट (वार्ता.) – ‘स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मंडळा’च्या वतीने पुण्यातील शाळांमध्ये ‘भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतीकारक’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येत आहेत. २७ ऑगस्ट या दिवशी कर्वेनगर येथील ज्ञानदा शाळेमध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान’चे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. आबादे सर, श्री. भागवत सर, श्री. पाटसकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे सर यांनी सहकार्य केले.