अमली पदार्थ सेवन करणार्या चालकांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणार्यांच्या जिविताला धोका ! – केरळ उच्च न्यायालय
कोची (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने प्रशासनाला अमली पदार्थांचे सेवन करणार्या बसचालकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा चालकांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणार्या सर्वसाधारण समाजाचा जीव धोक्यात येतो. एका बसचालकाकडे अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणी त्याला जामीन देण्याच्या संदर्भातील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील आदेश दिले. न्यायमूर्ती विजू अब्राहम यांनी अशा बसचालकांची अनुज्ञप्ती रहित करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले, तसेच बसचालकांचे अधूनमधून अचानक अन्वेषण करण्यासही सांगितले आहे.