‘सेंद्रिय शेती’ म्हणजे ‘नैसर्गिक शेती’ नव्हे !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘कोकोपीट’ वापरणे, पेठेतून सेंद्रिय खते विकत आणून झाडांना घालणे, कंपोस्ट खत बनवणे या गोष्टी सेंद्रिय शेतीत येतात; नैसर्गिक शेतीत येत नाहीत. ‘रासायनिक खतांच्या जागी सेंद्रिय खते वापरणे’ म्हणजे सेंद्रिय शेती. ही शेती अत्यंत खर्चिक आहे. हिच्यामध्ये उत्पन्नही अल्प आहे. याउलट नैसर्गिक शेतीत जीवामृत आणि बीजामृत वापरणे, पालापाचोळ्याचे आच्छादन करणे, आवश्यक तेवढेच पाणी देणे इत्यादी गोष्टी येतात. नैसर्गिक शेतीमध्ये झाडांसाठी उपयुक्त अशा सूक्ष्म जिवाणूंचे संवर्धन करण्यावर भर देण्यात येतो. या पद्धतीमध्ये खर्च नगण्य आणि उत्पन्न भरपूर असते. यासाठी सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेमध्ये नैसर्गिक शेतीविषयीची माहिती दिली जाते.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.७.२०२२)
(‘कोकोपीट’, म्हणजे ‘नारळाच्या बाह्य कवचापासून बनणारी एक प्रकारची भुकटी’ – संकलक)
(सविस्तर माहितीसाठी ‘सनातन संस्थे’च्या संकेतस्थळाची मार्गिका : https://www.sanatan.org/mr/a/84133.html)