नाशिक येथे मद्यपी महिलेचा बसमध्ये धिंगाणा
पोलिसांनाही केली शिवीगाळ !
नाशिक – जिल्ह्यातील घोटी बस स्थानकातून शेणीतपेहिरेकडे जाणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका महिलेने मद्य पिऊन २७ ऑगस्ट या दिवशी धिंगाणा घातला. या महिलेने बसमधील वाहक आणि प्रवासी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर चालकाने बस घोटी पोलीस ठाणे येथे आणली आणि महिलेला पोलिसांच्या कह्यात दिले; पण महिलेने पोलीस ठाण्यातील पोलिसांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून गोंधळ घातला. या वेळी पोलिसांनी महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला; मात्र ही महिला नशेत एवढी बेधुंद होती की, तिला ती काय करत आहे, याचे भानच नव्हते.