हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते माधव भांडारी यांची सदिच्छा भेट !
पुणे – हिंदु जनजागृती समितीच्या वतीन पराग गोखले आणि महेश पाठक यांनी ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते माधव भांडारी यांची भेट घेऊन त्यांचे नूतन पुस्तक प्रकाशनाविषयी अभिनंदन केले. येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, शिवाजीनगर येथे २७ ऑगस्ट या दिवशी ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या त्यांच्या नूतन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. या वेळी महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित उपस्थित होते. त्यांची भेट घेऊन त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.