झाडांना अती पाणी देणे टाळा !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘केवळ पाणी देण्याची वेळ झाली; म्हणून झाडांना प्रतिदिन पाणी घातले, असे न करता झाडांचे आणि मातीचे निरीक्षण करून आवश्यकता असल्यासच पाणी द्या. कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा लाडूप्रमाणे गोळा बांधला जातो का ? ते पहा. जर गोळा झाला, तर ‘पाण्याची आवश्यकता नाही. मातीत पुरेसा ओलावा आहे’, असे समजा. (एकदा अंदाज आल्यावर नेहमी माती उकरून पहाण्याचीही आवश्यकता नसते.) तसेच पाणी देण्याची आवश्यकता असेल, तर रोपांचे शेंडे मलूल झालेले दिसतात. अशा वेळी पाणी द्या. झाडांना अती पाणी देणे टाळा !’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, फोंडा, गोवा.
__________________________________
सविस्तर माहितीसाठी ‘सनातन संस्थे’च्या संकेतस्थळाची मार्गिका
https://www.sanatan.org/mr/a/83651.html
___________________