दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे तिघांचा मृत्यू
पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या राघोपूरच्या वीरपूरमध्ये २६ ऑगस्टच्या सायंकाळी विषारी दारू प्यायल्यामुळे काही जणांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रथम त्याच्या डोळ्यांवर परिणाम होऊन त्यांना दिसणे बंद झाले. नंतर त्यातील तिघांचा मृत्यू झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या मतदारसंघात ही घटना घडली आहे.
बिहार के राघोपुर में जहरीली शराब पीने से 3 लोगों की संदिग्ध मौत, 2 की हालत नाजुक https://t.co/UFYCFGzRz4
— ETVBharat Bihar (@ETVBharatBR) August 28, 2022
संपादकीय भूमिकाकाही आठवड्यांपूर्वी दारूबंदी असणार्या गुजरातमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. यावरून कायद्याद्वारे कोणत्याही गोष्टींवर बंदी घातली, तरी त्याला मर्यादा येतात, हे लक्षात येते. हे थांबण्यासाठी लोकांची भ्रष्ट मानसिकताच पालटण्याची आवश्यकता आहे. यासाठी जनतेला साधना शिकवणे आवश्यक. त्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे ! |