श्री महालक्ष्मी मंदिरात साहित्य ने-आण करण्यासाठी बॅटरीवर चालणारे वाहन अर्पण !
कोल्हापूर, २७ ऑगस्ट (वार्ता.) – श्री महालक्ष्मी मंदिरात प्रतिदिन सहस्रो भाविकांकडून हार, फुले, तसेच इतर साहित्य अर्पण केले जाते. हे साहित्य मंदिरातून बाहेर नेणे, तसेच लाडू-प्रसाद आणि अन्य साहित्य मंदिरातून आत-बाहेर करण्यासाठी दोन वाहनांची आवश्यकता होती. ही वाहने बेंगळुरू येथील भाविक मेकिपत्ती राजगोपाल रेड्डी यांनी अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील ४ लाख ५० सहस्र रुपयांच्या मूल्याचे बॅटरीवर चालणारे एक वाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला अर्पण करण्यात आले. या प्रसंगी भाविक मेकिपत्ती राजगोपाल रेड्डी, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर उपस्थित होते.