मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एक दिवसाची पथकर माफी !
मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दुरुस्तीचे काम चालू असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये; म्हणून २७ ऑगस्ट या दिवशी या महामार्गावरून जाणार्या वाहनांसाठी राज्य सरकारने १ दिवसासाठी पथकर माफ केला होता. सध्या या महामार्गावर दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे २ घंटे काही विशिष्ट ठिकाणी महामार्ग बंद करून वाहनांना जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून वळवण्यात आले होते. सकाळपासूनच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.