३३ टक्क्यांहून अधिक पीकहानी झालेल्या शेतकर्यांना भरपाई !
बीड – बीड, लातूर आणि धाराशिव या ३ जिल्ह्यांतील सोयाबीन आणि अन्य पिके यांची गोगलगायींमुळे मोठी हानी झाली आहे. पिकांचे पंचनामे करून ज्या शेतकर्यांची ३३ टक्क्यांहून अधिक हानी झाली आहे, अशांना साहाय्य देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्यशासनाने एका परिपत्रकाद्वारे पारित केले आहेत.
बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांसह राज्यात अन्य काही भागांतील १ लाख ६३ सहस्र ८८९ हेक्टर क्षेत्र गोगलगायींनी बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पिकांची हानी झालेल्या शेतकर्यांना साहाय्य मिळावे यासाठी हानी झाल्याचे पंचनामे करून अहवाल शासनास द्यावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त आणि संबंधित जिल्हा प्रशासन यांना राज्यशासनाने एक परिपत्रक काढून दिले आहेत.